1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री

Gas Cylinder Price Change From 1st August: दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

Updated: Aug 1, 2023, 11:25 AM IST
1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री title=
Rules changes from 1st august

Rules Changes From 1st August: आजपासून ऑगस्ट (August) महिना सुरू झाला आहे. आजपासून काही नियम बदण्यात आले आहेत. हे नियमातील बदल तुमच्या आयुष्यावर खास परिणाम करणारे असतील. त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक गणितावर होऊ शकतो. 1 ऑगस्टपासून 5 मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर होणार आहेत. कोणते नियम बदलणार आहेत जाणून घेऊया.. 

दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आयकर विवरणपत्रांसह जीएसटी व क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमांचा यात समावेश आहे. 

आयकर विवरणपत्र

31 जुलैच्या आत आयकर विवरणपत्र न भरणाऱ्या करदात्यांना 1 ऑगस्टपासून विलंब शुल्क भरावं लागणार आहे. 5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 5 हजारांपर्यंत शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे आता दंड भरण्यासाठी तयार रहा.

जीएसटी नियम

तुम्ही व्यावसायिक असाल तर, 1 ऑगस्टपासून 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक इन्व्हॉईस देणं बंधनकारक असेल. त्यामुळे या व्यावसायिकांनी याबाबत जाणून घ्यावं.

बँक सुट्ट्या 

ऑगस्टमध्ये बँकांना देशाच्या विविध भागांनुसार 14 दिवस सुट्ट्या राहतील. यात शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे आत्ताच तुमची बँकेची कामं उरकुन घ्या

स्वयंपाकाचा गॅस 

प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीचा आढावा तेल वितरण कंपन्यांकडून घेतला जातो. नवीन आदेशानुसार आता 19 किलोचा व्यवसायिक वापराचा एलपीजी गॅस सिलेंडर 99.75 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 

क्रेडिट कार्ड कॅशबॅक 

अॅक्सिस बँक आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुमच्या खिशावर भार पडणार आहे. 12 ऑगस्टपासून कॅशबॅक कमी होणार आहे.

आणखी वाचा - LPG Gas झाला स्वस्त; ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय; पाहा नवे दर

दरम्यान,  5 लाखांहून कमी पगार असलेले अनेकजण आहेत ज्यांना आयकर भरण्याची गरज नाही. मात्र असं असलं तरी आयकर परतावा भरणं फायद्याचं असतं. असं यासाठी की 2.5 लाख रुपयांहून अधिक पगार असलेल्यांना 5 टक्के कर भरावा लागतो. मात्र आरटीआय फाइल करताना 87 ए अंतर्गत रीबेट मिळतं. रीबेटची ही रक्कम 12 हजार 500 रुपयांपर्यंत असते. त्यामुळेच 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होतं.