Commercial LPG Gas Cylinder Prices Slashed: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना एक गुड न्यूज दिली आहे. व्यवसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तेल कंपन्यांनी कमी केले आहेत. त्यामुळेच एकीकडे भाज्या, डाळींच्या महागाईचा फटका बसणाऱ्या सर्वसामान्यांना अप्रत्यक्षरित्या काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस दरांचा आढावा घेतात. नवीन आदेशानुसार आता 19 किलोचा व्यवसायिक वापराचा एलपीजी गॅस सिलेंडर 99.75 रुपयांनी स्वस्त होणार आहे. हे दर तात्काळ प्रभावाने लागू होतील, असं सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
नव्या दरांनुसार दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची रिटेलमधील किंमत ही 1680 रुपये इतकी असणार आहे. मात्र हे दरांमधील बदल घरगुती वापरातीली एलपीजी सिलेंडर्ससाठी लागू होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
Oil marketing companies have reduced the prices of commercial LPG gas cylinders. The rate of 19 KG commercial LPG gas cylinders has been slashed by Rs 99.75 with effect from today. Delhi retail sales price of 19kg commercial LPG cylinder is Rs 1,680 from today: Sources
No change…
— ANI (@ANI) August 1, 2023
व्यवसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरवर कोणतीही सवलत दिली जात नाही. मुंबईमध्ये या गॅस सिलेंडरचे दर 1649.50 रुपये इतके आहेत.
सोमवारी व्यवहार संपल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर स्थिर आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. 1 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. 1 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईमधील पेट्रोलचे दर हे 106.31 रुपये प्रती लीटर आहेत. तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रती लीटर इतके आहेत. दिल्लीमधील पेट्रोलचे दर 96.72 प्रती लीटर इतके आहेत. राजधानी दिल्लीत डिझेलचे दर 94.27 रुपये प्रती लीटर इतके आहेत.