Sarkari Naukri 2021: 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! सेंट्रल फोर्समध्ये 25271 रिक्त पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच CAPF, NIA, SSF आणि GD च्या रिक्त पदांसाठी दहवी पास असणारे अर्ज करू शकतात. 

Updated: Aug 9, 2021, 03:31 PM IST
Sarkari Naukri 2021: 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! सेंट्रल फोर्समध्ये  25271 रिक्त पदांची भरती title=

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही जणांना आपलं काम बंद करावं लागलं. अनेक जण सरकारी नोकरी मिळावी म्हणून धडपड करत असतात. अशा नागरिकांसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर दहावी पास झाला असाल तर या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. 

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच CAPF, NIA, SSF आणि GD च्या रिक्त पदांसाठी दहवी पास असणारे अर्ज करू शकतात. कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी नोकरीचा फॉर्म निघाला आहे. तो कुठे भरायचा आणि अर्च करण्याची अंतिम तारीख कोणती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोणत्या विभागात रिक्त पदं- एसएससी जीडी कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट 2021 (SSC GD Constable Recruitment 2021)
एकूण रिक्त पदांची संख्या-  25271
पात्रता- मान्यताप्राप्त बोर्डाचं 10 वी पास असलेल्याचं प्रमाणपत्र आवश्यक 
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा- 18 ते 23 वर्ष वयोमर्यादा
पगार किती मिळणार- 21,700 – 69,100/- प्रति महिना
नोकरी करण्याची संधी कुठे मिळणार- संपूर्ण भारतात

या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 17 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधी दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक ती फी 2 सप्टेंबर 2021 पर्यंत भरणं अत्यावश्यक आहे. 7 सप्टेंबर फी भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. तुम्ही ऑनलाइन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे पेमेंट करू शकता. ओबीसीसाठी 100 रुपये फी असणार आहे. 

सेंट्रल आर्म फोर्सेस (Central Armed Police Forces) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी http://ssc.nic.in या साइटवर ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यानंतर परीक्षा आणि मैदानातील परीक्षा होणार आहे. यातून रिलेक्ट झालेल्यांची मेडिकल टेस्ट होईल त्यानंतर निवड करण्यात येणार आहे.