शरद पवार - मायावतींची बैठक... नेमकं काय शिजतंय?

आता परिस्थिती बदलली असल्याचं बसपा नेत्यांनी म्हटलंय.

Updated: Jul 27, 2018, 02:18 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपा अध्यक्षा मायावती यांच्यात काल बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा या दोन राजकीय पक्षात आघाडीच्या शक्यतेची चर्चा दिल्लीत सुरु झालीय. शरद पवार आणि मायावती या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगतलंय. मात्र, यावर बसपाच्या नेत्यांनी बोलण्यास नकार दिला. 

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्यापूर्वी मायावतींनी नकार दिला होता. मात्र आता परिस्थिती बदलली असल्याचं बसपा नेत्यांनी म्हटलंय. या बैठकीत बसपाचे खासदार सतिषचंद्र मिश्रा उपस्थित होते.