पंतप्रधान, उपराष्ट्रपतींसह या नेत्यांनी आज घेतली कोरोनाची लस

भारतात कोरोना साथीच्या विरोधात सुरु असलेला लढा आता एक पाऊल पुढे गेला आहे.

Updated: Mar 1, 2021, 05:30 PM IST
पंतप्रधान, उपराष्ट्रपतींसह या नेत्यांनी आज घेतली कोरोनाची लस title=

नवी दिल्ली : भारतात कोरोना साथीच्या विरोधात सुरु असलेला लढा आता एक पाऊल पुढे गेला आहे. सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त लोक यासाठी पात्र असतील. लसीकरणासाठी कोविन २.० पोर्टल आणि आरोग्य सेतु येथे नोंदणी करावी लागेल. यासाठी खासगी रुग्णालयांतील प्रत्येक डोससाठी 250 रुपये द्यावे लागतील. तर सरकारी रुग्णालयांना ही लस विनामूल्य मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कोरोना लस घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही केंद्रात कोरोनाची लस मिळू शकते. सकाळी 9 वाजेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला पोर्टलवर नोंदणी करणे शक्य नसेल तर तो थेट लसीकरण केंद्रावर जाऊन स्वत: देखील नोंदणी करू शकतो. यासाठी आपण आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिससह फोटो पासबुकसह सरकारकडून मंजूर झालेल्या 12 ओळखपत्रांपैकी कोणतीही एक दर्शवू शकता.

उपराष्ट्रपतींनी घेतली लस

पीएम मोदी यांच्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही लस देण्यात आली. ते म्हणाले, 'आज मी कोविड लसीचा पहिला डोस चेन्नईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतला. पुढील डोस 28 दिवसांनंतर घेईल. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांना आवाहन, कोरोना विषाणूविरूद्ध मोहिमेमध्ये सामील व्हा आणि लसीकरण करा.'

मुख्यमंत्र्यांनी घेतली लस

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कोरोना विषाणूच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लस लावण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले की, 'माझे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण त्या तरुणांना लस दिली पाहिजे ज्यांच्याकडे अजून खूप जीवन बाकी आहे. माझ्याकडे जगण्यासाठी अजून 10-15 वर्षे आहेत.'

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनीही आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

दिल्लीत 300 केंद्रे

दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, 'आजपासून दिल्लीत ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले आहे. 192 रूग्णालयात लसीकरणासाठी सुमारे 300 केंद्रे स्थापन केली गेली आहेत. आठवड्यातून 6 दिवस लसीकरण केले जाते. सरकारी रुग्णालयात लसीकरण विनामूल्य आहे.'

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही आज कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोना विषाणूची लस मुंबईतील बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जात आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ आहे. त्याअंतर्गत आज 2500 लोकांना लस देण्याची तयारी सुरू आहे. .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आज कोरोनाची लस घेतली.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये कोरोना लसचा पहिला डोस घेतला आहे. पंतप्रधानांनी लस घेण्यास पात्र ठरलेल्या सर्वांना आवाहन केले. पंतप्रधानांनी ट्वीट केले की, 'मी एम्समध्ये लसचा पहिला डोस घेतला. कोविड -19 विरुद्धच्या जागतिक लढाईमध्ये आमच्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी फारच कमी कालावधीत विलक्षण काम केले आहे. ते म्हणाले की एकत्र आपण भारत कोरोनापासून मुक्त करू.'