जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलाय. हाजिन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 8, 2017, 10:14 AM IST
 जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान जखमी title=

काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलाय. हाजिन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहे.

दरम्यान, पूंछ सेक्टरमध्येही सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती मरण पावल्यात.

दरम्यान भारतीय सैन्यानं देखील पाकिस्तानला सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमा भागात पाककडून सातत्याने उल्लंघन करण्यात येत आहे.