वाढदिवशी उद्धव ठाकरेंना मिळाला 'नवा भाऊ'!

नव्या' भावानं त्यांना आज ट्विटवर शुभेच्छा दिल्या आहेत

Updated: Jul 27, 2018, 11:36 AM IST
वाढदिवशी उद्धव ठाकरेंना मिळाला 'नवा भाऊ'! title=

मुंबई : आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना आज  वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आणि यंदाच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरेंना त्यांच्या नव्या भावानं शुभेच्छा दिल्यात. लोकसभेतल्या मोदींची गळभेट घेतल्यानंतर 'सामना'मध्ये भावा जिंकलसं या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली. राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं. आज उद्धव ठाकरेंच्या याच 'नव्या' भावानं त्यांना आज ट्विटवर शुभेच्छा दिल्या आहेत.

२०१९ निवडणुकीआधी आधी शिवसेना आणि भाजपमधला दुरावा... शिवसेनेची मोदींच्या कारभार साततत्यानं होणारी टीका... भाजप अध्यक्ष अमित शाहांनी स्वतंत्र लढण्याची तयारी  करण्याच्या दिलेल्या सूचना, काँग्रेसकडून भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न... या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा बरचं काही सांगून जाणाऱ्या आहेत. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात.