सिंडिकेट बॅंकमध्ये पाचशे जागांची भरती, त्वरा करा

सिंडीकेट बँकेमध्ये ५०० प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती होत आहे. 

Updated: Jan 5, 2018, 03:40 PM IST
सिंडिकेट बॅंकमध्ये पाचशे जागांची भरती, त्वरा करा  title=

नवी दिल्ली : बॅंकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंडीकेट बँकेमध्ये ५०० प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती होत आहे.

यासाठी १७ जानेवारी २०१८ ही अंतिम तारीख आहे. ही रिक्त जागा ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड / स्केल श्रेणीसाठी असेल. 

 १८ फेब्रुवारी पर्यंत परीक्षेची निश्चित तारीख कळणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही भर्ती होत आहेत.

उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यावरुन निवड केली जाईल.

 वेतनश्रेणी 

निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना १५ हजार रुपये वेतन (इंटर्नशिप दरम्यान) मिळेल. कोर्सच्या सुरुवातीच्या पहिल्या नऊ महिन्यांसाठी  ३ हजार रु. वेतन असेल.

जागा 

सर्वसाधारण वर्गासाठी २५२, ओबीसीसाठी १३५, अनुसूचित जातीसाठी ७५ आणि अनुसूचित जमातींसाठी ५८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पात्रता

 उमेदवारांना ग्रॅज्यएशनमध्ये ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांची मर्यादा ५५% ठेवण्यात आली आहे. उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षे ठेवली गेली आहे.

अर्ज फी 

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १००आणि इतर श्रेणी उमेदवारांना ६०० रूपये अर्ज फी भरावी लागेल.

संकेतस्थळ 

अधिक माहितीसाठी www.syndicatebank.in या संकेतस्थाळाला भेट द्या. यामध्ये करिअर विभागात जा आणि ‘PGDBF PROGRAMME 2018-2019’ या लिंकवर क्लिक करा.