म्हशीला विनाकारण त्रास देणं महिलेला पडलं महागात, अखेर असा मिळाला धडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरुन हसाल.

Updated: Jan 15, 2022, 06:03 PM IST
म्हशीला विनाकारण त्रास देणं महिलेला पडलं महागात, अखेर असा मिळाला धडा; पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : विनाकारण कोणाला त्रास देऊ नये असं नेहमी म्हणतात. आपण जर कोणाना विनाकारण त्रास दिला तर त्याचा मोबदला किंवा धडा हा आपल्याला मिळतो असे ही म्हटलं जातं. एका महिलेसोबत देखील असाच प्रकार घडला आहे. यामध्ये ही महिला म्हशीला त्रास देत होती. त्यानंतर या महिलेला असा काही धडा मिळाला, ज्याची तिने कल्पनाही केली नसावी. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया हे असं जग आहे. जेथे आपल्या असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरुन हसाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, म्हशीची विनाकारण कळं काढणं या महिलेला भलतंच महागात पडलं, कारण त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक म्हैस आरामात उभी असलेली दिसत आहे. त्याचवेळी एक महिला तिच्या जवळ उभी राहून तिच्यासोबत मजा करत आहे. कधी ती म्हशीला हाताने मारण्याचा प्रयत्न करते, तर कधी पाय लावते. हे करताना त्या महिलेला खूप आनंद होते. त्यानंतर काही वेळाने ती महिला म्हशीच्या वर बसण्याचा प्रयत्न करते. परंतु तेव्हा ही म्हैस आपलं डोकं मागे खेचले आणि ती महिला खाली पडते. ही महिला इतकी जोरात खाली पडते की, तिला किती लागलं असावं याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.

हा मजेदार व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. एवढेच नाही तर लोकं हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि त्याला आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करत आहेत. हा व्हिडीओ 'निर्मला वैष्णव' नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केला आहे. आतापर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.