Zerodha कंपनीचे सर्वेसर्वा Nithin Kamath यांचा तरुणांसाठी लाखमोलाचा सल्ला... वाचा

Zerodha: तुमचं वय 35 वर्षे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. नितिन कामथ यांनी दिलेला सल्ला तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच लाभदायक ठरु शकेल.

Updated: Oct 6, 2022, 09:20 AM IST
Zerodha कंपनीचे सर्वेसर्वा Nithin Kamath यांचा तरुणांसाठी लाखमोलाचा सल्ला... वाचा title=

Nithin Kamath: शेअर बाजाराच्या (Share Market) जगातील लोकप्रिय असलेल्या झेरोधा कंपनीचे सीईओ नितीन कामथ यांनी तरुणांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. वयाच्या 60 वर्षानंतर तुमचं आयुष्य कसं असावं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वयाच्या 35 वर्षांचे असताना आरोग्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असतो. 

काय म्हणाले नितीन कामथ?

झेरोधा कंपनीचे सीईओ नितीन कामथ (Zerodha founder and CEO Nithin Kamath) यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवारी ट्विट करुन एक लाख मोलाचा सल्ला दिला आहे. 'मेडिकल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या विकासामुळे वयाच्या 60 वर्षानंतर देखील लोक उत्तम प्रकारचं आयुष्य जगत आहेत. तुम्ही 35 वर्षांचे असताना आरोग्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर तुमचं 60 वर्षानंतरच्या आयुष्याची गुणवत्ता करत असते. वय वाढत असताना मी जेव्हा एक वर्षे मागे वळून पाहतो तर मी माझं धेय्य पुर्ण केलेलं आहे.' 

विना कर्जाचं सुरु केलं होतं स्टर्टअप

नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी आपल्या भावासोबत म्हणजेच निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्यासोबत ऑगस्ट 2010 साली झेरोधा नावाचा स्टर्टअप व्यवसाय सुरु केला होता. हे स्टार्टअप सुरु करताना त्यांनी कर्ज घेतलं नव्हतं. झेरोधाच्या माध्यमातून स्टॉक्स, म्यूचुअल फंड, करंसी, कम्यूडिटी, बाँड यांमध्ये ट्रेडिंक करता येते.

देशातील नामांकित ब्रोकिंग फर्ममध्ये झेरोधा (Zerodha) कंपनीचा उल्लेख केला जातो. या कंपनीमध्ये तब्बल 1 कोटी क्लाईंट्स सहभागी आहेत. यावरुन झेरोधा कंपनीच्या क्लाईंट्सवरुन त्यांच्या यशाचा अंदाज येऊ शकतो. क्लाईंटच्या प्रत्येक ट्रेडिंगवर 15 टक्क्यांचं योगदान झेरोधाचं असतं.