एक्सप्रेस वेवर भीषण अपघात... पाच जागीच ठार

शनिवारी संध्याकाळी मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 3, 2018, 10:14 PM IST
एक्सप्रेस वेवर भीषण अपघात... पाच जागीच ठार title=

मुंबई : शनिवारी संध्याकाळी मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय.

आत्ताच हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक्सप्रेस वेवर भरधाव वेगात असणाऱ्या एका कारची दुसऱ्या बाजुनं येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक बसली. 

लोणावळ्याजवळ झालेल्या या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. 

हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पो डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावर येऊन धडकला.

महत्त्वाचं म्हणजे, पाच जणांची आसन क्षमता असलेल्या कारमध्ये पाचऐवजी सात जण प्रवास करत होते. यामध्ये एक पुरुष ड्रायव्हर होता तर इतर सर्व महिला प्रवासी होत्या. या प्रवाशांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.