'...तेव्हा मुख्यमंत्री बोबड्या शब्दांत शुभंकरोती बोलत होते'

भाजपकडून करण्यात येणाऱ्या उपोषणावर अजित पवार यांनी ही नौटंकी असल्याची टीका केली... 

Updated: Apr 13, 2018, 05:03 PM IST
'...तेव्हा मुख्यमंत्री बोबड्या शब्दांत शुभंकरोती बोलत होते' title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून करण्यात येणाऱ्या उपोषणावर अजित पवार यांनी ही नौटंकी असल्याची टीका केली... 

तर सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. तर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा ही समाचार घेतला. 

मुख्यमंत्री 'शुभंकरोती' बोबड्या शब्दात बोलत होते तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, आमच्या दैवतावर हल्ला केला तर आम्ही 'आरे'ला आमच्या पद्धतीने 'का रे' असं उत्तर देऊ अशा शब्दांत मुंडे यांनी टीका केली.