एटीएम फोडून १३ लाख लंपास

या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात नाकाबंदी करत पुढील तपास सुरु आहे. 

Updated: May 30, 2018, 05:09 PM IST
एटीएम फोडून १३ लाख लंपास title=

येवला, नाशिक :  येवला तालुक्यातील बाभुळगाव इथल्या एस एन डी कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेचं एटीएम चोरट्यांनी  मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडलं. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत जवळपास १३ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. कॉलेज कॅम्पस परिसरात स्वच्छता करत असताना स्वच्छता कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली... त्यानंतर पोलिसांची मदत घेण्यात आली.

या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात नाकाबंदी करत पुढील तपास सुरु आहे.