औरंगाबादचा कचरा प्रश्न जैसे थे, प्रशासन-ग्रामस्थ बैठक निष्फळ

शहरातील कचरा कोंडी जैसे थे आहे. कारण प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा या कचरा प्रश्नावर निघालेला नाही. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 2, 2018, 11:18 PM IST
औरंगाबादचा कचरा प्रश्न जैसे थे, प्रशासन-ग्रामस्थ बैठक निष्फळ title=

औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडी जैसे थे आहे. कारण प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा या कचरा प्रश्नावर निघालेला नाही. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

गेल्या १५ दिवसांपासून औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचरा कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि विभागीय आयुक्तांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत त्यांना तीन महिना मुदतीची मागणी केली. 

तसंच कचरा प्रश्न सोडवण्यासोबतच नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली. मात्र नारेगावचे ग्रामस्थ कचरा टाकू न देण्यावर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत ते माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरलीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि प्रशासनात बैठक होण्याची शक्यता आहे.