काँग्रेस - राष्ट्रवादीला चंद्रकांत पाटील यांचे चॅलेंज

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी...

Updated: Sep 20, 2018, 07:18 PM IST
काँग्रेस - राष्ट्रवादीला चंद्रकांत पाटील यांचे चॅलेंज title=

सातारा : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत हिंमत असेल तर वेगवेगळे होऊन निवडणूक लढावी, असे आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. विकास कामांच्या योजनांचे उद्घाटन करताना हा इशारा दिला.

साताऱ्यातील दुष्काळी भागातील गावांना टेम्भू योजनेतून पाणी दिले जाणार आहे. या आणि अशा योजनांचे उदघाटन म्हसवड आणि मायणी या ठिकाणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर झालेल्या सभेत लवकरच या दुष्काळी भागातील लोकांना पाणी मिळेल असेही हे सांगताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला.