काँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?

पुणे  लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.  

Updated: Feb 22, 2019, 07:44 PM IST
काँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय? title=

पुणे : जिल्ह्यात लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची की बाहेरच्या उमेदवाराला याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे काँगेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यासह सांगलीतील इच्छूकांची बैठक चव्हाण यांनी पुण्यात घेतली. पुण्यामध्ये काँग्रेकडून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छूकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

आमच्यापैकी कुणालाही द्या पण बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी पुणे काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील इच्छूकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याबाबत अहवाल राज्य समितीकडे पाठवण्यात येईल आणि पुढे केंद्रीय समिती त्यावर निर्णय घेईल, असे चव्हाण म्हणाले. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी संभ्रम काय ठेवला आहे.