कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Coronavirus in Pune : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jan 12, 2022, 09:06 AM IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय title=

पुणे : Coronavirus in Pune : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी ऑक्सिजनची मागणी कमी आहे. सध्या पुण्यात केवळ 55 टक्के ऑक्सिजनची मागणी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान पुणे शहरात 120 टन ऑक्सिजनची मागणी होती. मागणी वाढण्याच्या शक्यतेने पुणे विभागासाठी एकूण 178  टन ऑक्सिजनचा उत्पादकांकडून पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती  अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांची दिली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एक हजार 240 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जिल्हा प्रशासनाने केली व्यवस्था केली आहे. ऑक्सिजनची मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरुन 63 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी 63 पैकी 42 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. 21 प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर 42 प्रकल्पांतून एक हजार 240 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा बंदकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मनोरंजन उद्याने, प्राणिसंग्रहालय, वस्तू संग्रहालये, किल्ले, सशुल्क ठिकाणे आणि कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे बंद  करण्यात आली आहेत.

 जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, किल्ले,  स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.