Chhagan Bhujbal: ब्राम्हण वाद विकोपाला, मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी!

Death threat to Chhagan Bhujbal: रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून परशुराम सेनेने छगन भुजबळांना आव्हान दिलं होतं. त्यावेळी भुजबळांना कानाखाली मारणाऱ्या लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर आता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Updated: Aug 21, 2023, 07:49 PM IST
Chhagan Bhujbal: ब्राम्हण वाद विकोपाला, मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी! title=
Death threat to Chhagan Bhujbal

Chhagan bhujbal brahman community: अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्राह्मण वाद विकोपाला गेल्याचं पहायला मिळत आहे. ब्राह्मण समाजातील (brahman community) लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. त्यानंतर आता छगन भुजबळ यांना धमकीचा पुन्हा एकदा फोन आल्याने आता नाशिक पोलीस आयुक्तांना तोंडी तक्रार देण्यात आली आहे.

रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून परशुराम सेनेने छगन भुजबळांना आव्हान दिलं होतं. त्यावेळी भुजबळांना कानाखाली मारणाऱ्या लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. कुठल्याही समजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. मी देवीदेवांबद्दल मत मांडलं होतं. परंतु, आमच्या घरात सगळे देव आहेत. एकाने मला विचारलं तुम्हाला लक्ष्मी चालते तर मग सरस्वती का नाही चालत? अरे आम्हाला सगळं चालतं, असं म्हणत भुजबळ यांनी रोखठोक उत्तर दिलं होतं.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून माझी भूमिका बदलणार नाही, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं होतं. आपण आपले देव ओळखायला शिकले पाहिजे. ज्यांनी मुलामुलींना शिक्षण प्रवाहात आणलं त्यांची पुजा केली पाहिजे. कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. त्यावेळी त्यांनी संभाजी भिडेवर देखील हल्लाबोल केला होता. 

आणखी वाचा - Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी संभाजी भिडेंबद्दल केलेल्या विधानावरुन वाद

दरम्यान, संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे स्पष्ट करायला हवं. त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी असेल, तर संभाजी नाव लावण्याची त्यांना आवश्यकता का भासली? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर वाद टोकाला गेल्याचं दिसून आलं होतं. त्याचबरोबर सरकारची डोकेदुखी देखील वाढली आहे.