पुणे : मांत्रिकाला आणणा-या डॉक्टवर गुन्हा दाखल

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेला एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला होता. 

Amit Ingole Updated: Mar 14, 2018, 01:11 PM IST
पुणे : मांत्रिकाला आणणा-या डॉक्टवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेला एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला होता. एका डॉक्टरनं मांत्रिकाला बोलावून एका अत्यवस्थ महिलेवर तंत्रमंत्राचा वापर केल्याचं प्रकरण पुढे आलंय. याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्य आरोग्य सेवा संचलनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंगेश हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पुणे महापालिकेला आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ३ डॉक्टरांची समिती करणार चौकशी तयार करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे चव्हाण नर्सिंग होमचीही होणार चौकशी होणार आहे. 

महिलेच्या छातीत दुधाची गाठ तयार झाली होती. आरोपी डॉक्टर सतीश चव्हाण या महिलेवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर या महिलेची तब्येत खालावल्याने मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. 

तिथे उपचार सुरू असताना डॉक्टर सतिश चव्हाण एका मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिकाने रुग्णालयातच त्याचे तंत्र मंत्र विधी केले. याच चव्हाण डॉक्टरवर जादूटोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close