पश्चिम महाराष्ट्र गारठला, धुक्याची चादर पसरलेय

गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी आता महराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात परत यायाला सुरुवात झालीय. पुणेकरांनी आजही धूसर वातावरणाचा अनुभव घेतला. 

Updated: Dec 12, 2017, 10:37 AM IST
पश्चिम महाराष्ट्र गारठला, धुक्याची चादर पसरलेय title=

पुणे : गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी आता महराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात परत यायाला सुरुवात झालीय. पुणेकरांनी आजही धूसर वातावरणाचा अनुभव घेतला. शहर आणि परिसरात पहाटे मोठ्या प्रमाणावर धुकं दाटलं होतं. मात्र ते नेमकं धुकं आहे की धुरळा याविषयी साशंकता आहे.

धुलीकणांच्या प्रमाणात वाढ

काहींच्या मते हे धुळ आणि धूर यांचं मिश्रण असलेला धुरळा आहे. अशा वातावरणात अगदी ५० मीटर्सच्या पुढचंही दिसेनासं झालं होतं. वातावरणात सुक्ष्म आणि अतिसुक्ष्म धुलीकणांचं प्रमाण वाढल्यास ही परिस्थिती उद्भवते. हा प्रदुषणाचाच भाग असून तो आरोग्यास हानीकारक असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे वातावरणातील या बदलाचा नीट अभ्यास होणं आवश्यक आहे. 

वाहतूक संथ गतीने

तिकडे सांगलीकरांची आजची पहाट धुक्यात हरवली. सांगली आणि मिरज या दोन्ही शहरात सकाळी धुक्याची दाट चादर पसरली. त्यामुळे महार्माग आणि शहरांतर्गत वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू होती.