Gram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं

राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठापणाला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

Updated: Dec 20, 2022, 12:52 PM IST
Gram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं title=

Maharashtra Gram panchayat Election : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल (Gram Panchayat Result) लागत आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. . विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाबरोबरच (Shinde Group) प्रत्येक पक्षातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कन्या भाविनी पाटील (Bhavini Patil) यांचा विजय झाला. पण त्यांच्या ग्रामविकास पॅनलला मात्र पराभव स्विकारावा लागला.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल LIVE : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपची सत्ता

जळगावमधल्या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाविनी पाटील यांनी आपलं ग्राम विकास पॅनल उभं केलं होतं. या निवडणुकीत भाविनी पाटील यांच्या पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटीलांच्या पॅनलला मिळालं आहे. विशेष म्हणजे शरद पाटील हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. 

मोहाडी ग्रामपंचायतिच्या निकालाकडे जळगाव जिल्हा सह राज्याचं लक्ष लागून होतं. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, पण निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

मोहाडी हे भाविनी पाटील यांचं सासर आहे, गेल्या वेळी भाविनी पाटील मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. पण यंदा सरपंचपद महिला एसटी वर्गासाठी राखीव असल्याने भाविनी पाटील यांनी सदस्यपदाही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदस्य म्हणून भाविनी पाटील विजयी झाल्या, पण त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला यश मिळवता आलं नाही.

ग्रामपंचायतीचे इतर निकाल
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा इथल्या ग्रामपंचायतवर  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेआणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. राज्यात बिघाडी असली तरी स्थानिक पातळीवरती दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र लढले होते. कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूकीत हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या चुलत भावाचा पराभव झाला. माजी उपसरपंच मोहन माने यांना पराभवाचा धक्का बसलाय. रुकडी गावात सत्ता राखण्यात खासदार धैर्यशील माने यांना यश आलं, पण चुलत भावाचा पराभव झाला. शिरोली गावात सतेज पाटील गटाची असणारी  सत्ता उलथवून लावण्यात धनंजय महाडिक यांना यश आलं. महाडिक गटाच्या पद्मजा करपे याची सरपंच पदी निवड झाली. । 18 पैकी 17 जागा पटकावीत महाडिक गटाने केला सतेज पाटील गटाचा पराभव केला.