पुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक

NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी महाराष्ट्रातील पुणे, ठाण्यासह 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यासह कर्नाटकात देखील एनआयएने देखील छापेमारी केली आहे.  

आकाश नेटके | Updated: Dec 9, 2023, 10:56 AM IST
पुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक title=

NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी सकाळपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे 44 ठिकाणी छापे टाकले आहे. जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या माध्यमातून देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पुणे-मीरा भाईंदरचा समावेश आहे. याशिवाय कर्नाटकात एका ठिकाणी छापे टाकले जात आहेत. आयएसआयएस ही जगातील सर्वात भयानक दहशतवादी संघटना म्हणून गणली जाते.

या छाप्यांदरम्यान, एनआयएने दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि परदेशी स्थित आयएसआयएस हँडलर्सच्या सहभागासह मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. एनआयएच्या तपासात भारतामध्ये आयएसआयएसच्या दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या लोकांचे एक नेटवर्क उघड झाले आहे. भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए तपास करत आहे. यापूर्वीही असे छापे टाकण्यात आले असून त्यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्रात दहशतवाद्यांच्या मागावर असलेल्या एनआयएनने आयएसआयएसशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ठाणे जिल्ह्यात 31 ठिकाणी तर पुण्यात 2 ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएने पुण्यात कोंढवा आणि मोमिनपुरा परिसरात छापे टाकले आहेत. कोंढव्यातील तालाब फॅक्टरी येथील एका सोसायटीमधून शोएब अली याच्या घरी छापेमारी करण्यात आली असून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तर मोमिनपुराच्या गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अलीच्या याच्या घरी केलेल्या छापेमारीतही मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. एटीएसच्या मदतीने ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.