ईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी!

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय. 

Updated: Jun 13, 2017, 02:16 PM IST
ईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी! title=
प्रातिनिधिक फोटो

पुणे : ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय. 

जंगली महाराज रस्त्यालगत अत्रे यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात सध्या कोणी राहायला नाही, मात्र त्यांच्या संस्थेकडून तेथे नियमित शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित जातात. बंगल्याच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांने तेथे ठेवलेले मोबाईल संच लांबविले होते.

अटक करण्यात आलेला मुलगा अनाथ आहे. ईदसाठी कपडे घ्यायचे म्हणून त्यानं ही चोरी केल्याची कबुली दिलीय. त्यानं अत्रे यांच्या बंगल्यातून मोबाईल चोरले होते. चोरीची घटना शनिवारी उघडकीस आली. 

त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. पोलिसांकडून अत्रे यांच्या बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर गेल्या चार दिवसापासून गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस आरोपीच्या शोधत होते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केलीय.