"राऊतांना आलेल्या धमकीची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे", Navneet Rana यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या!

Gujarat Election Result 2022: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत (Sanjay raut) यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राऊतांना आलेल्या धमकीमुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Updated: Dec 8, 2022, 10:53 PM IST
"राऊतांना आलेल्या धमकीची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे", Navneet Rana यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या! title=
navneet rana,sanjay raut

Navneet Rana On Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमकीचे दोन फोन आले होते, असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे सरकारमधील (Eknath Shinde) मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पत्रकार परिषदेनंतर या धमक्या आल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राऊतांना आलेल्या धमकीमुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाल्या Navneet Rana?

संजय राऊत (Sanjay Raut) हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना आलेल्या धमकीची चौकशी ही गांभीर्याने झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. मला विश्वास आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याची गांभीर्याने कोणताही भेदभाव न करता चौकशी करतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी गुजरात (Gujrat) आणि हिमाचल प्रदेशच्या (HP) निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं.

गुजरातचा विजय हा नक्कीच मोदींचा विजय असल्याचं राणांनी यावेळी म्हटलंय. एखाद्या राज्यात अनेक वर्ष सत्ता राखणं सोपी गोष्ट नसते. काँग्रेस (Congress) जिथं काम करत नाही तिथं भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली जात आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रसवर टीकास्त्र देखील सोडलंय. काँग्रेसने ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे. तिथे ताकतीने उभा राहिला पाहिजे, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

आणखी वाचा - Gujarat Result 2022: कोण होणार गुजरातचे मुख्यमंत्री? भाजपकडून 'या' बड्या नावाची घोषणा!

दरम्यान, नवनीत राणा यांनी संजय राऊत (Navneet Rana On Sanjay Raut) यांना आलेल्या धमकीवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळी देखील असेल. त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे, असंही राणा म्हणाल्या आहेत.