कालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश

पुणे कालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश

Updated: Oct 5, 2018, 09:22 PM IST
कालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश title=

पुणे : कालवा फुटीच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. पूरग्रस्त परिवारांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था करावी, असे आदेश न्यायालयानं दिलेत. 

महापालिका, पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित बैठक घेऊन पुरग्रस्तांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. 

असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, विद्या बाळ, शिवाजी गदादे-पाटील आणि नगरसेविका प्रिया गदादे-पाटील यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयानं हे आदेश दिलेत.