सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

 सर्व उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचा एका उमेदवार तर बैलगाडयातून मोठ्या मिरवणुकीत मुलाखतीसाठी आला होता.

Updated: Jul 2, 2018, 08:54 AM IST
सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी title=

सांगली: सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडे एकूण २४०, राष्ट्रवादीकडे २९८ तर भाजपाकडे ३४० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मूलखती सुरू झाल्या आहेत. तिन्ही पक्षाकडून सांगली आणि मिरज शहरात मुलाखती घेतल्या जात आहेत. सर्व उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचा एका उमेदवार तर बैलगाडयातून मोठ्या मिरवणुकीत मुलाखतीसाठी आला होता.

इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन

दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनही करण्यास सुरूवात केली आहे. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून आपण नेतृत्वाच्या नजरेत यावे हा उद्देश असला तरी, नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्याचाही प्रयत्न उमेदवारांकडून होताना दिसत आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी अनेकजण इच्छूक असले तरी, तिकीटत एकालाच द्य़ावे लागते. अशा वेळी पक्ष कोणाच्या पारड्यात तिकीटाचे दान टाकतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

सांगलीकरांचा कौल कोणाला

दरम्यान, सांगली जिल्हा हा नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमिवर सांगली, कुपवाड, मिरज महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याबाबत उत्सुकता आहे. प्रदीर्घ काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील राजकीय समिकरणे गेल्या काही वर्षांमध्ये बदलली आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदाच शिवसेना, भाजपने या जिल्ह्यात जोरदार मुसांडी मारली आहे. हा विचार करता शहरातील जनता कोणाला कौल देते याबाबत उत्सुकता आहे.