पुणे : अभियांत्रिकीचा पेपर फोडणारा विद्यार्थी ताब्यात

Updated: May 27, 2018, 08:23 PM IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंजिनिअरींगचा पेपर फुटल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलंय. परीक्षा केंद्रावर मोबाईल नेऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून त्याने ते व्हायरल केल्याचं समोर आलंय.

इंजिनिअरींगचा मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटला होता. आदर्श रविंद्र असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. एमआयटीला तो इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. 

या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिलीय.