पुणे पोलीस दलात दाखल झालाय नवीन सिंघम

पुण्यातल्या गुन्हेगारांनो, आता तुमचं काही खरं नाही...

Updated: Sep 19, 2018, 12:06 PM IST
पुणे पोलीस दलात दाखल झालाय नवीन सिंघम title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या गुन्हेगारांनो, आता तुमची खैर नाही... कारण, पुण्यात एक नवा सिंघम दाखल झालाय. आखाड्यात मल्लांना चीतपट केल्यानंतर आता या सिंघमनं गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी बाह्या सरसावल्यात. 

पुण्यातल्या गुन्हेगारांनो, आता तुमचं काही खरं नाही... पुणे पोलीस दलात नवा सिंघम दाखल झालाय. आखाड्यात मल्लांना लोळवल्यानंतर आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला विजय चौधरी सज्ज झालेत. ते पोलीस उपाधीक्षक पदावर रुजू झालेत.

कुस्ती हेच विजय चौधरींचं ध्येय होतं... लाल माती आणि मॅटवरची कुस्ती गाजवल्यानंतर ट्रिपल केसरी ठरलेले विजय चौधरी आता गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार आहेत. 

विशेष म्हणजे, कुस्तीच्या आखाड्यात विजय चौधरींना गंभीर दुखापत झाली होती. करिअर संपलं असं वाटत असतानाच लढवय्ये विजय चौधरी दुखापतीशी दोन हात करत उभे ठाकले. 

पोलीस उपाधीक्षक झाल्यावरही विजय चौधरी कुस्तीचा सराव सुरूच ठेवणार आहेत. आता गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून विजय चौधरी नव्या आखाड्यात दंगल गाजवायला सज्ज झालेत.