पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव

 या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला

Updated: Aug 4, 2018, 12:48 PM IST
पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव निवडून आलेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या विनोद नढे यांचा ४७ मतांनी पराभव केलाय. 

महापौर पदासाठी भाजपकडून राहुल जाधव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनोद नढे इच्छुक होते... कुणीही माघार न घेतल्यानं महापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या राहुल जाधव यांना ८० मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना ३३ मतं मिळाली.

उल्लेखनीय म्हणजे, या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला... त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.