आरएसएसचे भाजपसाठी बौद्धीक मंथन, खडसे आणि देशमुखांची दांडी

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप मंत्री व आमदारांचे बौद्धीक  घेण्यात येत आहे. मात्र,  एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख यांनी या शिबिराला दांडी मारलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2017, 10:06 AM IST
आरएसएसचे भाजपसाठी बौद्धीक मंथन, खडसे आणि देशमुखांची दांडी title=

नागपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप मंत्री व आमदारांचे बौद्धीक  घेण्यात येत आहे. मात्र,  एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख यांनी या शिबिराला दांडी मारलेय.

गुजरात निवडणुकींच्या निकालनंतर 

संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात येते. गुजरात निवडणुकींच्या निकालनंतर होत असलेल्या या बौद्धिक वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित आहेत.

खडसे - देशमुख अनुपस्थित 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आशिष देशमुख अनुपस्थित राहिले आहेत. गैरहजर असलेल्या आमदारांकडून पक्ष स्पष्टीकरण मागणार आहे, अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी दिली.

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप जमिनीवर आल्याचे दिसत आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला मोठा संघर्ष करावा लागला. काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केल्याने पक्षाला काठावर बहुमत मिळालेय. त्यामुळे या बौद्धीक शिबिराचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे.