रत्नागिरीतील तरुणांनी घोरपडीला दिले जीवनदान

रत्नागिरीतील तरुणांनी एका घोरपडीला जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत येऊन अडकलेल्या घोरपडीला या तरुणाने पुन्हा तीला जंगलात सुरक्षीत सोडले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 21, 2017, 07:13 PM IST
 रत्नागिरीतील तरुणांनी घोरपडीला दिले जीवनदान  title=

रत्नागिरी : रत्नागिरीतील तरुणांनी एका घोरपडीला जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत येऊन अडकलेल्या घोरपडीला या तरुणाने पुन्हा तीला जंगलात सुरक्षीत सोडले आहे.

प्रामुख्यानं जंगलात आढळणारी ही घोरपड रत्नागिरीच्या फिनोलेक्स काँलनी येथे मध्यरात्री  आढळली. काही वेळातच ही बातमी आजूबाजूच्या परीसरात वाऱ्यासारखी पसरली. या घोरपडीला पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. प्रविण कदम , सुशिल कदम आणि आण्णा वायंगणकर या तरुणांनी ही घोरपड पकडली आहे. या तरुणांच्या सजगतेमुळे त्या घोरपडीला जीवनदान मिळाले आहे. 

पाण्याच्या पिंपामागे ही घोरपड अडकली होती. अडकल्यानं तिला हालता देखील येत नव्हते. त्यात दुसऱ्या बाजूने लोकांचीही गर्दी होत होती. जवळपास सहा ते साडेसहा फुट लांबीची ही घोरपड असून तिला सुरक्षित जंगलात सोडण्यात आल्याचे समजते.