व्हिडिओ : बरळले कदम, भोगावं लागलं तावडेंना

भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचं आश्वासन तावडेंनी आंदोलन करणाऱ्या महिलांना दिलंय

Updated: Sep 5, 2018, 12:59 PM IST
व्हिडिओ : बरळले कदम, भोगावं लागलं तावडेंना  title=

 

मुंबई : राम कदमांच्या वादग्रस्त विधानांची झळ आता राज्यातल्या भाजपच्या मंत्र्यांना बसायला सुरुवात झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं आज शिक्षण मंत्री विनोद तावडेंना घेराव घातला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी, महिलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेत राम कदम यांच्याविषयीच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचं आश्वासन तावडेंनी आंदोलन करणाऱ्या महिलांना दिलंय.

धिक वाचा : व्हिडिओ : दहीहंडीच्या गर्दीसमोर राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला

'नाही म्हणणाऱ्या मुलींना पळवून आणून तुमच्या समोर उभं करीन' असं म्हणणाऱ्या आमदार राम कदमांच्या विधानांची त्यांच्या पक्षानं आता दखल घेतलीय. या प्रकरणी राम कदमांना व्हिडिओ क्लीप सादर करण्याचे आदेश पक्ष नेतृत्वानं दिले आहेत. कदमांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्यानं जोर धरतेय. त्यामुळे आता पक्षानं कदमांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

अधिक वाचा : या तरूणीकडून भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेन्ज