घोटाळ्याविरोधात एमपीएससी उमेदवारांचा नाशिकमध्ये मूकमोर्चा

एमपीएससीतला घोटाळा झी २४ तासने उघड केल्यावर आता एमपीएससीच्या उमेदवारांनी नाशिकमध्ये मूकमोर्चा काढला. 

Updated: Jan 31, 2018, 07:14 PM IST
घोटाळ्याविरोधात एमपीएससी उमेदवारांचा नाशिकमध्ये मूकमोर्चा title=

नाशिक : एमपीएससीतला घोटाळा झी २४ तासने उघड केल्यावर आता एमपीएससीच्या उमेदवारांनी नाशिकमध्ये मूकमोर्चा काढला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथमच असा मूकमोर्चा काढल्याने संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलंय. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलीय. 

आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं

राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाखांहून अधिक आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उमेदीचा काळ लागलेला असतो. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये घोटाळे होत असतील तर विद्यार्थ्यांच्या या महत्त्वाच्या कालखंडाशीच खेळ होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं निर्माण केलंय. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयतर्फे व्हावी अशी मागणी करण्यात आली.  

पारदर्शक कारभार कसा चालणार?

एमपीएससी घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असं आश्वासन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलंय. परीक्षा पद्धतीत मूलभूत बदल करण्याची विनंती ते करणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात. मात्र असं असतानाही असे डमी विद्यार्थी सिलेक्ट होणार असतील तर पारदर्शक कारभार कसा चालणार असा सवाल विद्यार्थी करत आहेत.