रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी, नागरिकांचे मोठे हाल

 Raigad Rain : रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी गेले आहेत. (Seven deaths due to floods and landslides in Raigad ) महाड, पोलादपूरमध्ये हाहाकार उडाला आहे.    

Updated: Jul 23, 2021, 09:44 AM IST
रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी, नागरिकांचे मोठे हाल  title=

अलिबाग : Raigad Rain : रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी गेले आहेत. (Seven deaths due to floods and landslides in Raigad ) महाड, पोलादपूरमध्ये हाहाकार उडाला आहे. ( Mahad flood) पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, नेव्हीचे बचावकार्य सुरु झाले आहे. महाड पुराने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महाडमध्ये मोबाईल आणि अन्य संपर्क यंत्रणा अजूनही ठप्प आहे. याठिकाणी बचावकार्याला सुरुवात झाली आहे. नौदलाची टीम महाडमध्ये दाखल झाली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.  

महाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल

अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Mahad flood ) पुराचं पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.  महाडमध्ये विविध भागात लोक अडकले आहेत. महाडच्या तळीये गावात कोसळलेल्या दरडीत 32 घरं बाधीत झाली आहेत. 72 लोक या दरडीत अडकले आहेत. 

अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. रायगडमध्ये बचाव कार्यासाठी काल हेलीकॉप्टरची मागणी केली होती. आज बचाव कार्यासाठी नेव्हीचे हेलीकॉप्टर दाखल झाले आहे. दरम्यान, महाड शहर आणि परिसरातील पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. येथील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात झाला आहे. त्यामुळे दुसरा दिवसही अंधारात काढवा लागला आहे. पुराचे पाणी अजूनही पाणी कमी झालेले नाही. दरम्यान, NDRF चे बचावकार्य सुरू झाले आहे. (NDRF rescue operation started in Chiplun) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. विदर्भातल्या अमरावतीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra flood)