सुप्रिया सुळेंकडे 145 कोटींची मालमत्ता, नावावर गाडी नाही तर पार्थकडून घेतलेय कर्ज

 बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तब्बल145 कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Updated: Apr 3, 2019, 11:13 PM IST
सुप्रिया सुळेंकडे 145 कोटींची मालमत्ता, नावावर गाडी नाही तर पार्थकडून घेतलेय कर्ज title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खासदार  सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्याकडे तब्बल145 कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना त्यांच्याकडे एकही गाडी नाही. त्यांच्याकडे गाडी नसल्याचे कळल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अब्जाधीश सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचे कर्ज आहे. तसेच पार्थ पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी कर्ज घेतले आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडेही सुप्रियांची उसनवारी असल्याचे पुढे आले आहे.

प्रतिज्ञापत्रात जंगम 21 कोटी 26 लाख रुपये आणि स्थावर 18 कोटी 40 लाख अशी मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार करोडपती असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या नावावर एकही गाडी नाही आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपला उमेदवार अर्ज आज भरला. 
 
सुप्रिया सुळे यांचा अर्ज भरता मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार पार्थ पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.