'थर्टी फर्स्ट'मुळे सरकारी तिजोरीतही भर!

३१ डिसेंबर सेलिब्रेट करण्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील सज्ज झालेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक दिवसाचे वैयक्तिक मद्य सेवनाचे तीन लाख परवाने दिलेत. 

Updated: Dec 30, 2017, 11:23 PM IST
'थर्टी फर्स्ट'मुळे सरकारी तिजोरीतही भर! title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : ३१ डिसेंबर सेलिब्रेट करण्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील सज्ज झालेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक दिवसाचे वैयक्तिक मद्य सेवनाचे तीन लाख परवाने दिलेत. 

मद्याशिवाय ३१ डिसेम्बरची पार्टी म्हणजे, जवळपास अशक्यच... आणि मद्य आलं म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभाग आलाच. पुण्यात ३१ डिसेंबरची पार्टी आणि त्यासाठीचे परवाने यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे रीघ लागल्याचं चित्र आहे. ३१ डिसेंबरच्या मद्य पार्टीसाठी एक दिवसाचे १५० परवाने देण्यात आले आहेत. त्यात आणखी वाढ होणार आहे. या परवान्यातून पन्नास लाख लायसन्स फीदेखील मिळाली आहे. एक दिवसाच्या मद्य पार्टी बरोबरच एक दिवसाच्या मद्य पिण्याच्या परवण्याला देखील मोठी मागणी आहे.  

उत्पादन शुल्क विभागाची यारी सुरु असताना, पोलिसही तयारीत आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री ड्रंक अॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात वाहतूक पोलिसांची मोहीमच असणार आहे. मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी, २८ ठिकाणी चेक पॉईंट उभारण्यात आली आहेत. तर, शंभरच्या वॉर ब्रिथ अनालायझर मशीन असणार आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर थेट खटले भरले जाणार आहेत. 

परवाने देऊन उत्पादन शुक्ल विभाग सरकारच्या तिजोरीत भर घालणार आहे... तर, कारवाई करून पोलिसही तेच करणार आहेत. सरणार वर्ष अगदी जाता जाता सरकारच्या तिजोरीत काही कोटींची कामं टाकून, संपणार आहे. सरकारला नवीन वर्षाची चांगली भेट यापेक्षा काय असू शकते.  त्यामुळं, तुमचा-आमचा थर्टी फस्ट कसाही गेला तरी, सरकारचा मात्र चांगलच जाणार आहे...