Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का?

Shiv Sena : शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता.  ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे.  त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना' नाव वापरता येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2023, 10:13 AM IST
Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का? title=

Maharashtra Politics : शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता.  ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे. आता शिवसेना ही शिंदेंची झाली आहे. पक्षाबरोबर चिन्हही शिंदे गटाचे झाले आहे.  (Maharashtra Politics)  त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्याकडे आता शिवसेना आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण नाही. (Shiv Sena) त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना' नाव वापरता येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  (Maharashtra Political News in Marathi )

मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता

दरम्यान, अशीही चर्चा सुरु झाली आहे की, उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा नव्याने कामाला लागावे लागणार आहे. नव्याने पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. त्याचवेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांना पक्ष बांधणीत गुंतवणूक ठेवायचे आणि दुसरीकडे निवडणूक त्यामुळे त्यांना काहीही करता येणार नाही, अशी विरोधकांची व्युहरचना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्यातच  'शिवसेना' नाव वापरण्याबाबत निर्बंध येऊ शकतात, अशीही शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  आणि मशाल चिन्ह हेही निवडणूक आयोग गोठवू शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे यांना नवीन नावाचा प्रस्ताव ठेवून नव्याने पक्षबांधणीची प्रोसेस करावी लागणार आहे, अशीही एक चर्चा आहे.

 'शिवसेना' नाव उद्धव ठाकरे वापरु शकतात...

दरम्यान, मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्या तरी  'शिवसेना' नाव उद्धव ठाकरे वापरु शकतात. कारण आधीही अनेक पक्षांत फूट पडलेली दिसून आली आहे. मूळ नाव वापता येत नसले तरी  'शिवसेना' नावाच्या आधी दुसरे नाव वापरुन  'शिवसेना' नाव वारता येऊ शकते. काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर संघटनात्मक काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस अशी विविध राजकीय पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेसचा उल्लेख करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर  'शिवसेना' नाव उद्धव ठाकरे यांना वापरता येऊ शकते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तात्पुरते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे. तसेच पक्ष चिन्ह म्हणून पेटती मशाल दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही गोष्टी निवडणूक आयोग गोठविण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नव्या नावाची मागणी करावी लागेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल, याचीही उत्सुकता आहे.

निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?

निवडणूक आयोगाने (EC) शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानून ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिले. पक्षाच्या नियंत्रणासाठी प्रदीर्घ लढाईनंतर आपल्या 78 पानांच्या आदेशात आयोगाने उद्धव ठाकरे गटाला राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण होईपर्यंत ‘मशाल’ निवडणूक चिन्ह ठेवण्याची परवानगी दिली आहे.