मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसेचं आंदोलन

मुंबई मनपा मनमानी करत असल्याचा आरोप...

Updated: Feb 13, 2020, 04:19 PM IST
मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसेचं आंदोलन title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांविरोधात मोर्चा आणि आंदोलन केलं. त्याच मनसेच्या कार्यालयाखाली आता फेरीवाले बसणार आहेत. त्याला मनसेने विरोध दर्शवलाय. फेरीवाल्यांविरोधात गुरुवार मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. राजगड कार्यालय ते महानगरपालिका जी उत्तर विभाग कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू झाला आहे. 

या मोर्चामध्ये मनसे नेते नितीन सरदेसाई उपस्थित आहेत. निवासी क्षेत्रात फेरीवाले धोरण राबवण्यात येणार आहे. मनसेचे मुख्यालय असलेल्या दादर राजगड खालीच महानगरपालिका फेरीवाल्यांना बसवणार आहेत. मनसेचे राजगड हे कार्यालय असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्वेअरपर्यंतच्या पदपथांवर १०० फेरीवाले बसवले जाणारेत. आणि त्यालाच मनसेचा विरोध आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चा काढला आहे.