मध्य रेल्वेला मराठी भाषेच वावडं

मध्य रेल्वेला मराठी भाषेच वावडं आहे का ? असा सवाल सध्या उपस्थित होतोय.

Updated: Aug 11, 2018, 04:29 PM IST

मुंबई : मध्य रेल्वेला मराठी भाषेच वावडं आहे का ? असा सवाल सध्या उपस्थित होतोय. याच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर वायफाय बद्दल ज्या जाहिराती लावण्यात आल्यात. त्यावर मिळवा ऐवजी मिलवा, तर CSMT ऐवजी CST असा चुकीचा उल्लेख करण्यात आलाय. तातडीनं दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेनं दिलाय.