वाद पेटणार? लोढानंतर आता दीपक केसरकारांचंही मुंबई महानगरपालिकेत कार्यालय

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :   शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका मंत्र्याला मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाच्या नेत्यालाही मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 3, 2023, 09:19 PM IST
वाद पेटणार? लोढानंतर आता दीपक केसरकारांचंही मुंबई महानगरपालिकेत कार्यालय title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :   शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका मंत्र्याला मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाच्या नेत्यालाही मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात (Mumbai Municipal Corporation) नागरिकांसाठी आता उपलब्ध राहणार आहेत.राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे मुंबईकर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत उपलब्ध असणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर नागरी कार्यालयात पालकमंत्री केसरकर नागरिकांशी संवाद साधतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  केसरकर यांच्या नागरी संपर्कासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

काही महिन्यापूर्वी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांनी मुंबई महानगरपालिकेत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उघडल्यानंतर याला शिवसेना ठाकरे गट ,काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी विरोध केला होता आता मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत दर बुधवारी बसणार आहेत. यालाही विरोध होण्याची शक्यता. सध्या मुंबई महानगरपालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय बंद आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांसाठी अशी विशेष व्यवस्था का ? ही एक प्रकारे हुकूमशाही आहे असा प्रश्न लोढा यांना कार्यालय दिल्यानंतर विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

महत्त्वाचं म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून पाहिला जातोय. मात्र या कार्यालय उघडण्याच्या आडून मुंबई महानगरपालिकेत भाजप हस्तक्षेप करताय एक प्रकारे घुसखोरी करतोय असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. आता दीपक केसरकर यांचे कार्यालय उघडल्यानंतरही पुन्हा एकदा हा वाद होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेत जवळपास दीड वर्षापासून प्रशासन कारभार हाकत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही तत्पूर्वी अशा पद्धतीच्या घडामोडी घडत असल्यामुळे याबाबत विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.