मुंबई पुणे एक्प्रेस वेवरचा प्रवास आता महागणार;टोलमध्ये तब्बल इतक्या रुपयांनी वाढ

मुंबई पुणे एक्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Updated: Sep 15, 2022, 09:28 PM IST
मुंबई पुणे एक्प्रेस वेवरचा प्रवास आता महागणार;टोलमध्ये तब्बल इतक्या रुपयांनी वाढ title=

मुंबई पुणे एक्प्रेस वेवरील (Mumbai–Pune Expressway) प्रवास आता महागणार आहे. मुंबई पुणे एक्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये (Toll) तब्बल 18  टक्के वाढ होणार आहे. 1  एप्रिल 2023 पासून ही वाढ होणार आहे. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्प्रेस वेवरून (Mumbai–Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18  टक्के वाढ करण्यात येईल अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने (MSRDC) 2004 मध्ये काढली होती. त्यानंतर ही टोल वाढ करण्यात येत आहे.

याआधी 1  एप्रिल 2020 रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील वर्षी 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढणार आहेत. मात्र 1  एप्रिल 2023 पासून लागू होणारे टोलचे दर 2030   पर्यंत कायम राहणार आहेत असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं आहे.

टोल किती वाढणार?
             सध्याचे दर             नवे दर

कार          270 रूपये       320 रूपये

टेम्पो         420 रूपये        495 रूपये

ट्रक          580 रूपये        685 रूपये

बस           797 रूपये        940 रूपये

थ्री एक्सेल   1380 रूपये     1630 रूपये

एम एक्सेल  1835 रूपये     2165 रूपये