ओबीसींचे मुंबईत आझाद मैदानात आक्रोश आंदोलन

ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी येथील आझाद मैदानात आक्रोश आंदोलन सुरु केलेय. या आंदोलनात ओबीसी एकत्रीकरण समिती आणि ओबीसीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2017, 11:30 AM IST
ओबीसींचे मुंबईत आझाद मैदानात आक्रोश आंदोलन title=

मुंबई : ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी येथील आझाद मैदानात आक्रोश आंदोलन सुरु केलेय. या आंदोलनात ओबीसी एकत्रीकरण समिती आणि ओबीसीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत.

ओबीसी आरक्षण संपविण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सरकारची भूमिका आणि शिष्यवृत्तीत करण्यात आलेली कपात याविरोधात ओबीसी संघर्ष समिती आझाद मैदानात आजपासून आक्रोश आंदोलन करत आहे.

या आंदोलनात कुणबी समाजोन्नती संघ, अखिल भारतीय भंडारी समाज संघ, अखिल आगरी समाज परिषद, आगरी शेतकरी प्रबोधिनी, कुंभार समाज संघटना, कोळी-मच्छीमार संघटना, माळी समाज संघटना तसेच नाभिक, तेली अशा विविध संघटना सहभागी झाल्यात.  

 आंदोलन कशासाठी?

 - ५०० कोटी रुपये असलेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत  ४४६ कोटी  रुपयांची कपात करण्यात आली आहे. ती ५४ कोटी केली.

-  मेडीकलच्या जागा २७ टक्क्यांवरून २ टक्के इतक्या कमी केल्या.

- ओबीसींच्या पदोन्नती विरोधी उच्चन्यायालयाने निर्णय दिलाय.

  या आहेत प्रमुख मागण्या

- ओबीसी वर्गातील विद्यार्थियांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीत वाढ करुन ती १००० कोटी करण्यात यावी.

- मराठा समाजाला ओबीसी वर्गात सहभागी न करता त्यांना स्वतंत्र आरक्षण जातीनिहाय जनगणना करुन लोकसंखेच्या आधारावर  देण्यात यावे.