पालघरमध्ये भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी

पालघरमध्ये भाजपची नवी खेळी

Updated: May 8, 2018, 05:22 PM IST
पालघरमध्ये भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी title=

मुंबई : पालघर निवडणुकीची रंगत आणखीच रंगतदार होत चालली आहे. राजेंद्र गावित यांना भाजपकडून उमेदवारी देण्य़ात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत याबाबत घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेने असं वागायला नको होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी म्हटलं आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती.

ही जागा भाजपकडेच राहिली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून भाजप येथून निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 
काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विकासाच्या मुख्यधारेमध्ये येण्यासाठी पालघरचा विकास झाला पाहिजे म्हणून भाजपमध्ये येत असल्याचं गावित यांनी सांगितलं असं मुख्यमंत्र्य़ांनी म्हटलं आहे. चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा हे शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.