मुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, उद्या असा करा प्रवास!

मध्ये रेल्वेवर रविवारी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2018, 10:24 AM IST
मुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, उद्या असा करा प्रवास! title=

मुंबई : मध्ये रेल्वेवर रविवारी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

रेल्वे सेवा आठ तास बंद 

मध्य रेल्वेवरील परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल सेवा सहा ते आठ तासांपर्यंत बंद राहणार आहे. 

म्हणून रात्री ऐवजी रविवारचा दिवस

गर्डर उभारताना संपूर्ण मार्गावरील विद्युतपुरवठा खंडीत करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगत सहा ते आठ तासांपुरता हा प्रवाह खंडीत करण्यात येणार आहे. ही कामे रात्री करणे कठीण असल्याने रविवारचा दिवस निवडण्यात आलाय.

अशी वाहतूक सुरु राहणार

सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल दादर आणि कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तिथूनच त्या पुन्हा ठाणे, कल्याणच्या दिशेने सोडण्यात येतील. दादर, कुर्ला आणि ठाण्यातून सुटणाऱ्या आणि या स्थानकासाठी शेवटचा थांबा असणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कायम राहणार आहे.

बस, टॅक्सीला प्राधान्य द्या

दादरहून सीएसएमटीकडे जाण्यासाठी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडावेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे. त्यासाठी प्रवाशांना दादरहून पश्चिम रेल्वेने किंवा बस, टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागेल.