उद्धव ठाकरेंचा 'सामना'च्या संपादकपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरेंचं नाव आता सामनाच्या संपादकपदी नसणार....

Updated: Nov 28, 2019, 04:47 PM IST
उद्धव ठाकरेंचा 'सामना'च्या संपादकपदाचा राजीनामा title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवं नेतृत्व उद्यास येत आहे. आज संध्याकाळी शिवतिर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6:40 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 ला 10 वाजून 14 मिनिटांनी मुंबईमध्ये झाला होता.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. सामनाचं संपादकीय हे नेहमीचं देशभरात चर्चेचा विषय ठरतं. आतापर्यंत सामनातून अनेक लेख प्रकाशित झाले आहे. ज्यामधून कधी टीका तर कधी कौतुकही झालं आहे. पण आता सामनाच्या पहिल्या पानावर उद्धव ठाकरे यांचं संपादक म्हणून नाव नसणार आहे. पण संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून कायम राहणार आहेत.

सामना हा मराठी आणि हिंदी या दोन भाषेमध्ये प्रकाशित होते. सामनाची सुरुवाती शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी 1988 ला केली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी 1993 ला हिंदी वृत्तपेपर ही सुरु करण्यात आला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 17 नोव्हेंबर 2012 नंतर शिवसेनेसह सामनाची जबाबदारी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली होती.

आजच्या संपादकीयमध्ये, महाराष्ट्रात नवा सूर्योदय झाला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा होताच महाराष्ट्राच्या मनात आनंदाची तंरग निर्माण झाली होती. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशात जे आनंदाचं वातावरण होतं. तसाच आनंद आणि उत्साह आज महाराष्ट्राताच नाही तर संपूर्ण देशात आहे.'