पद्मश्री नवाब सैफ अलीला जामीन

अभिनेता सैफ अली खानला जामीन मंजूर झाला आहे. काही वेळापूर्वीच त्याला कुलाबा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यासाठी सैफला ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकली असती.

Updated: Feb 22, 2012, 09:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अभिनेता सैफ अली खानला जामीन मंजूर झाला आहे. काही वेळापूर्वीच त्याला कुलाबा पोलिसांनी अटक केली होती.   अनिवासी भारतीय आणि साऊथ अफ्रिकेतील उच्चपदस्थ अधिकारी इक्बाल शर्माला मारहाण केल्याप्रकरणी सैफ अली खान याच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यासाठी सैफला ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकली असती.

सैफ अली खान याच्यासह तिघांना प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सैफ अली खान याने ताज हॉटेल मधील वासबी रेस्टॉरंटमध्ये इक्बाल शर्मा याला मारहाण केली होती.  सैफ अली खान आणि त्याचे मित्र रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी सैफ अली खान आणि मित्रांनी मोठमोठ्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावर शेजारच्या टेबलवर असलेल्या इक्बाल शर्मा यांनी सैफ यांना आवाज कमी करण्याची विनंती केली. परंतु, त्यानंतर झालेल्या बाचाबाची होऊन मारहाण झाली. या मारहाणीत इक्बाल शर्मा यांच्या नाकाला इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

ही मारहाण झाली तेव्हा सैफ अली खान सोबत बेबो म्हणजेच करीना कपूर देखील हजर होती. सैफ अली खान यांच्याविरोधात इक्बाल यांनी तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला.  पोलिसांची एक टीम सैफ अलीची चौकशी करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी दाखल झाली होती, तेव्हा त्यावेळी सैफ अली खान उपस्थित नव्हता.  या ठिकाणी करीना कपूर उपस्थित होती. पोलीस सैफच्या मागावर होतेत.  ३२५ हे  कलम अजामीनपात्र असल्याचे सांगण्यात आले होते. या कलमांतर्गत सैफ अली खानला अजामीपात्र अटक होण्याची शक्यता होती.

 

 

कसा घडला प्रकार

कुलाब्याच्या ताज हॉटेलमध्ये सैफ अली खान मित्रांसोबत जेवण्यासाठी गेला होता. यावेळी सैफची गर्लफ्रेंड करिना कपूर आणि करिश्मा कपूरही त्याच्यासोबत असल्याची माहिती आहे. सैफच्या शेजारच्या टेबलावर साऊथ अफ्रिका ट्रेड अँड इन्व्हेन्स्टमेंटचा डेप्युटी डिरेक्टर जनरल इकबाल शर्मा बसला होता. मोठ्या आवाजात चर्चा करणाऱ्या सैफला त्याने आवाज कमी करायला सांगितले.

 

यामुळं चिडलेल्या सैफनं शांतता हवी असेल, तर लायब्ररीत जाण्याचा सल्ला इक्बालला दिला. यानंतर सैफने चायनीज बॉल इकबालच्या चेहऱ्यावर फेकून मारला. त्यानंतर सैफने इक्बालच्या चेह-यावर गुद्दा मारला. यात इकबालच्या नाकाचे हाड मोडले आणि तो जखमी झाला. पहाटे चार वाजता हा प्रसंग घडला. हा सर्व प्रसंग हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. इकबालने सैफविरुद्ध कुलाबा पोलिसांत तक्रार दाखल केली. कुलाबा पोलिसांनी सैफला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास सांगितलं.

 

२००८ मध्ये छायचित्रकारालाही मारहाणीचं प्रकरणी गुन्हा

२००८ मध्ये पटियालात एका छायाचित्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सैफवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सैफनं माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटलं होतं. चिंकारा शिकार प्रकरणामध्येही सैफ खान अडचणीत आला होता.सैफवर आता दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यासाठी सैफला ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.