कार्यकर्त्यांचा राडा, टोलनाका फोडला

दुपारी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हल्ला करून तो फोडण्यात आला आहे. टोल नाक्यावरील केबिन पूर्णपणे तोडण्यात आल्या आहेत. तर त्याच बरोबर तेथील संपूर्ण सामानाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.

Updated: Apr 30, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com, तासगाव

 

आमदार संजय पाटील यांना टोलनाक्यावर मारहाण झाल्यानंतर दुपारी खेड शिवापूर टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. विधान परिषदेचे आमदार संजय पाटील यांना टोलनाक्यावर सकाळी मारहाण झाली होती. त्याचे पडसाद तासगावात उमटले. तिथं कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

तर दुपारी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हल्ला करून तो फोडण्यात आला आहे. टोल नाक्यावरील केबिन पूर्णपणे तोडण्यात आल्या आहेत. तर त्याच बरोबर तेथील संपूर्ण सामानाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.

 

पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर आमदार संजय पाटील यांना सकाळी मारहाण करण्यात आली होती. आमदार असल्याचं सांगूनही मारहाण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. दरम्यान, मारहाण प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आमदार संजय पाटील यांना मारहाण करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे.

 

तसेच राष्ट्रवादीने तासगाव बंदचे आवाहन केले होते. आमदार पाटील मारहाणीचे परिसरात लगेचच पडसाद उमटले. आमदार असल्याचं सांगूनही मारहाण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. टोल नाक्यावर आजही मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात  येत आहे. टोल नाके चालविणाऱ्यांची मुजोरी वाढल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाली आहे. परंतु, सरकार दुर्लक्ष करीत  असल्याचा आरोप करण्यात येत आहे.