दीपीकाची ‘अक्षय’शी जवळीक

Last Updated: Tuesday, November 22, 2011 - 17:36

झी 24 तास वेब टीम, मुंबई

बॉलिवूडच्या नायिकांची अक्षय कूमारशी जवळीक असणं यात नवं काहीच नाहीच, खरतरं अक्षयच्या स्वभावाची तिच तर खासियत आहे. आता दीपीका पदुकोणने अक्षय विषयी वाटणाऱ्या आपुलकीच्या ओलाव्याचा पुनरुच्चार केला आहे.

हाऊसफूल आणि चांदनी चौक टू चायनामध्ये अक्षय आणि दीपीका रोमाँटिक पेअर होते. आता आगामी देसी बॉईजमध्ये ही दोघं लव-हेट रिलेशनशीप आहेत आणि दिपीकाला त्यामुळेच ही भूमिका साकारणं काहीसं अवघड जात होतं. आता हे स्वाभाविकच आहे म्हणा अक्षयच्या व्यक्तिमत्वाचा करिषम्याने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री घायाळ झाल्या होत्या, मग दीपीका झाली त्यात नवल ते काय. देसी बॉईजमध्ये दिपीका आणि जॉन अब्राहाम अशी जोडी आहे. आणि अक्षय चित्रंगदा बरोबर रोमाँटिक भूमिकेत आहे.

डेविड धवनचा मुलगा रोहित धवन या सिनेमातून पदार्पण करतोय. मला अक्षय आवडत नाही असा भाग या सिनेमात साकारायचा होता आणि मला तो खुपच आवडत असल्याने तसा अभिनय करणं मला खरचं अवघड जात होतं इति दीपीका पदुकोण. खऱ्या खुऱ्या आयुष्यात असलेली जवळिक आणि पडद्यावर तो नावडता असल्याचं अभिनय करणं खुपच कठिण होतं पण कलाकारांना हे कसब अंगी बाणवावंच लागतं असं दीपीकाचं म्हणणं आहे. मी आणि अक्षय या सिनेमात जोडीदार असू अशी अनेकांची अटकळ होती पण त्यात नाविन्य काहीच उरलं नसतं.

जॉनसोबत असलेल्या सीन्समध्ये अक्षय आहे आणि आमच्या तिघांची चांगली मैत्री असल्याने या सीन्समध्ये ती केमिस्ट्री दिसून येते. हा सिनेमा  मुलांमधली मैत्री आणि त्याच्या शोधाबाबत आहे पण मुलींशिवाय त्याला परिपूर्णता आली नसती असंही दीपीकाचे म्हणणं आहे. जाता जाता एवढचं की अक्षयबद्दल आपुलकीचा ओलावा असणं किंवा जवळीक असणं इतपत ठीक आहे पण त्याचं रुपांतर अती जवळीकीत झाल्यास ट्विंकल ट्विंकल लीटल स्टार नव्हे तर डोळ्यासमोर काजवे चमकु शकतात हे दीपीकाने ध्यानात ठेवलेलं बरं.

First Published: Tuesday, November 22, 2011 - 17:36
comments powered by Disqus