प्रणवदा राष्ट्रपतीपदावर विराजमान

भारताचे नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केलीय. प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीय. भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली.

Updated: Jul 25, 2012, 03:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारताचे नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केलीय. प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीय. भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांनतर मावळत्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडून प्रणवदांनी पदभार स्वीकारला.

 

या सोहळ्या दरम्यान प्रोटोकॉलप्रमाणे नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामीही देण्यात आलीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी राष्ट्रपती म्हणून सभागृहात पहिलं भाषणं दिलं. शपथविधीच्या सोहळ्याला सेंट्रल हॉलमध्ये बहुतेक सर्वच नेत्यांनी उपस्थिती लावली होती. शपथविधी सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणासाठी सभागृहात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसंच खासदार उपस्थित होते. माजी राष्ट्रपती एपीजे अब्लूल कलाम हेही यांनीही या सोहळ्याला उपस्थित लावली. राष्ट्रपती म्हणून देशाला उद्देशून प्रणवदांनी पहिलं भाषण दिलं. गरीबी हा देशासाठी अभिशाप असल्याचं सांगत गरीबी दूर करण्याची गरज त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. त्यानंतर प्रणवदांना राष्ट्रपती भवनाकडे सन्मानाने नेण्यात आलं.

 

आज प्रणव मुखर्जींचा शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, मेट्रो स्टेशन तसच संसद परिसरातील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

 

.