औरंगाबाद अपघातात सात ठार

Last Updated: Wednesday, June 27, 2012 - 11:46

www.24taas.com,औरंगाबाद

 

औरंगाबाद पैठण रोडवर ढाकेफळ फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झालेत. वाळूच्या भऱधाव ट्रकने अँपेरिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर रिक्षाच्या चालकासह आणखी एकाचा मृत्यू झाला.

 

पैठणहून औरंगाबादकडे येणा-या या रिक्षाला समोरून येणा-या वाळूच्या ट्रकने ध़डक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि रिक्षा हवेत उडाली, घटनास्थळीच 5 लोकांचा मृत्यू झाला तर दोघांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

मोहम्मद सलीम, अब्दुल करीम, मोहम्मद इरफान मोहम्मद निजाम, हाजी मोहम्मद, कादीर शेख, शेख निसार अशी मृतांची नावं आहेत. तर एका व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="128302"]

First Published: Wednesday, June 27, 2012 - 11:46
comments powered by Disqus